तडका
चर्र् र… करून चुलीवर तडक्याचा आवाज आला कि प्रत्येकाच्या मनात जेवणाची मेजवानी नाचायला लागते स्पेशली त्यात संन्डे असेल तर… मग प्रत्येकाचे वेगवेगळे मूड क्रियेट होण्यासाठी सुरूवात होते. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कशा बद्दल बोलतोय. अशाच एका मूड ची हि जराशी मुडी आणि काॅमेडी कविता तडका…!
TADAKA MARATHI POEM
लेखन आणि दिग्दर्शन: श्रीजय ( जय गोपाळ पालवकर )
कविता वाचन : चिन्मय दिवेकर
MUSIC : पिनाकी राॅय
DOP & EDITING : गणेश नायक स्मित शाहा
RECORDING STUDIO: Quick Time Production
कलाकार : दिपक आणि प्रणाली
विशेष आभार : श्रीधर तानाजी पाटील | मनोज माळकर | मनीष पेडणेकर
तडका मराठी कविता
तडका…
चर्र् करून चुलीवर तडक्याचा आवाज आला
बायकोने फोडणी दिली मस्त प्यायचा मूड झाला
प्रेमाने जवळ जात विचारलं काय गं काय करतेस
माझी चिकन म्हणाली कोंबडीच तिखट जरा बनवते
मस्का तिला मारण्यासाठी पुढे मदतीचा हात केला
चर्र् करून चुलीवर तडक्याचा आवाज आला
शंका तिच्याही मनात आली त्या शंकेने मला विचारलं
टिव्ही समोरचं पाऊल आज किचनमध्ये कसं घसरलं
प्रेम खोचत कमरेमध्ये लगेच प्रश्न केला मला
चर्र् करून चुलीवर तडक्याचा आवाज आला
रस्सा चालेल पण थोडसं सुक्कही जरा बनव
दोन शब्द ऐकावे लागते, चालेल तू ही मला सुनव
रागाचा तिचा पारा डायरेक्ट शंभरावर गेला
चर्र् करून चुलीवर तडक्याचा आवाज आला
मग हात पुसत पदराला ती जवळ माझ्या आली
हसतच विचारलं.. राव आज भलतीच चव झाली
घमघमाट जसा चिकनचा तसा घसाही कोरडा झाला
चर्र् करून चुलीवर तडक्याचा आवाज आला
रविवारची सुट्टी आहे फक्त आजच्याच दिवस घेतो
शरीर खुप दुखतंय आणि आज मित्रही घरी येतोय
यापुढे कधीच पिणार नाही खोटं वचनही दिलं तिला
चर्र् करून चुलीवर तडक्याचा आवाज आला .
✍ श्रीजय..!
TADAKA a Marathi poem.
How husband is tempted for Alchohol when wife making good recipes in the kitchen.
This video is not encouraging Anyone to alchohol so DRINK RESPONSIBILY !
Thank you